राज्य मराठी विकास संस्था
मराठी संकेतस्थळांची स्पर्धा २०१३

स्वागत

राज्य मराठी विकास संस्थेचे स्वरूप आणि कार्य यांसंबंधीची माहिती सर्व जिज्ञासूंपर्यंत पोचविणाऱ्या संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत !

विविध क्षेत्रांत होणारा मराठीचा वापर अधिकाधिक गुणवत्तापूर्ण होत जावा यासाठी प्रयत्नशील राहावे व मराठी भाषेच्या अभिवृद्धीची प्रक्रिया नियोजनपूर्वक गतिमान करावी ही या संस्थेच्या स्थापनेमागील दोन मुख्य उद्दिष्टे आहेत. त्यांनुसार सर्व स्तरांवर मराठीचा विकास साधण्यासाठी संस्था स्वतंत्रपणे उपक्रम हाती घेते. भाषा व संस्कृतीच्या क्षेत्रांत मराठी भाषेच्या अभिवृद्धीसाठी काम करणाऱ्या विविध शासकीय व अशासकीय संस्थांमध्ये समन्वय राखून त्या संस्थांच्या साहाय्यानेही काही उपक्रम संस्था पार पाडते.

सूचना

  • मराठी भाषा समाजाच्या तळापर्यंत रुजून सुदृढ व्हावी आणि सर्वांगाने बहरावी यासाठी आपले यांसंदर्भातील विचार, मते, सूचना आम्हाला जरूर कळवा. आपल्यातील सुसंवादातून मराठीच्या विकासाला गती मिळेल.

  • प्रकाशचित्र दालन

    नियमित आयोजित होणाऱ्या कार्यक्रमांची छायाचित्रे