मध्ययुगातील संतांचे विविधांगी वाङ्मय हा मराठी साहित्यातील महत्त्वाचा सांस्कृतिक ठेवा आहे. श्रीसमर्थ रामदास स्वामी यांचा श्री दासबोध हा ग्रंथ आजही अनेकांच्या नित्यपठणात असलेला आढळतो. समर्थ रामदासांचे केवळ तत्त्वज्ञानच नव्हे तर त्यांचा व्यासंग, निरीक्षणातील बारकावे, समकालीन परिस्थितीचे भान इ. अनेक गोष्टींचे दर्शन हा ग्रंथ घडवतो. हा संपूर्ण ग्रंथ श्राव्य पुस्तकाच्या स्वरूपात संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे. गेल्या तीन दशकांपासून मराठी नाट्य व चित्रपट क्षेत्रात संगीतकार म्हणून नावाजलेल्या श्री. राहूल रानडे यांनी या श्राव्य पुस्तकासाठी संगीत दिले असून राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ख्यातनाम गायक पंडित संजीव अभ्यंकर यांच्या आवाजात हा ग्रंथ ऐकता येणार आहे.


या श्राव्य पुस्तकाचे सर्व अधिकार राज्य मराठी विकास संस्थेच्या अधीन असून हे पुस्तक जनतेसाठी विनामूल्य स्वरूपात संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे. त्यांची विक्री करणे, ती आपल्या संकेतस्थळावर घालणे इ. गोष्टी करणाऱ्या व्यक्ती वा संस्था आढळल्यास त्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

दासबोध दशक निवडा

दशक ०१ - स्तवनाचा
दशक ०२ - मूर्खलक्षणांचा
दशक ०३ - स्वगुणपरीक्षा
दशक ०४ - नवविधा भक्ती
दशक ०५ - मंत्रांचा

दशक ०६ - देवशोधन
दशक ०७ - चतुर्दश ब्रह्मांचा
दशक ०८ - मायोद्भव
दशक ०९ - गुणरूप
दशक १० - जगज्जोतीनाम

दशक ११ - भीमदशक
दशक १२ - विवेकवैराग्य
दशक १३ - नामरूप
दशक १४ - अखंडध्याननाम
दशक १५ - आत्मदशक

दशक १६ - सप्ततिन्वय
दशक १७ - प्रकृतिपुरुष
दशक १८ - बहुजिनसी
दशक १९ - शिकवण
दशक २० - पूर्णनामदशक

इतर श्राव्य पुस्तके  निवडा 

 

कृष्णाकाठ

कविता विंदांची

कविता कुसुमाग्रजांची