सायुज्यमुक्ती – मुक्तस्थिति, ब्रह्मरूप, सारखेपणा, एकरूपता.
वाक्शून्य – मुका, अबोल.
मुर्डीव शुंडादंड – मुरडलेली सोंड.
तुर्या – चवथी, शेवटची.
शाब्दो वदोनि – तत् त्वम् आदी आधार धरून.
उर्णतंतु – लोकरीचा बारीक धागा.
वेंगडी – खोकडी वळाली.
वैरागर – खाण.
गौल्यता – बोलण्याची माधुरी.
पडिमरु – आधरु.
वोळले – दृष्टी करीत आहेत.
तारुवे – जहाजे.
पवाड – पराक्रम.
लापणिका – मिथ्या, थोतांड.
कुहिट – विटून, कुजून.
थारा – आधार.
वोगळणे – संचार करणे.
उडुगणी – नक्षचलोकात.
देवलंड – कुलकर्मादि देवकार्य न करणारा.
पितृलंड – श्राद्धकर्मादि न करणारा.
भंडडभंड – शक्ती नसताना तोड (उपाय) करणारा.
लंडी – भित्रा.
निचाड – चाड न बाळगणारा, निलाजरा.
चौबारा बाहेरी वैसे – चव्हाट्याबाहेर शौचविधीस बसणे.
वैधृति व्यतिपात – अयोग्य वेळी.
अष्टगुण – आठपट.
तुक – महत्त्व.
रारोत्तरी – चढेलपणाने बोलणारा, बरोबरीचे बोलणारा.
धारकी – धारेवर.
पर्वत – देवघेव करणारा.
पत्रेविण -  कागदपत्रांशिवाय.
गोही – बोलावणे.
जाजू – आळ.
आदरवणेपण – हयगय.
बहुचक – चोंबडा.
लोलंगता – विषयासक्ती.
लाताड – खादाड.
पैशून्यवचनी - चहाडखोरपणाचे, ठकबाजीपणाचे.
गाठ्याळ – आतल्या गाठीचा.
तलपकी – मात्रागमनी.
अदत्त – कवडी चुंबक.
झोंड – कोडगा.
आदखणा – मत्सरी.
कातरु – भ्याड.
तुर्भुंड – डोईखुपशा
सितरू – फसव्या.
बंड – आडदांड.
आळव्येपण – हपाप, हव्यास.
काविरे – संचार होणे.
इसाळ – चेव.
यातायाती – क्लेश, हिंसा.
पडणी – कडेलोट.
कोवसा – आधार, रक्षक.
अग्रारे – अग्रहार, जमीन.
जेंगट  - घोष करणारी.
चांदवे – छत्र्या.
धूशर – बुक्का.
पद्महस्ती – चांगले गुण असलेला.
व्युत्पत्ती – ज्ञान, विद्वता.
अनिर्वाच्य – शब्दातीत.
ब्रह्मकटाव – ब्रह्मांडाचे गोल.
पर्ता – वेगळा.
खांबसूत्री – कळसूत्री.
आत्मारामु – वेगळा.
वंत्रधारी – मार्गदर्शक.
पढतमूर्ख – शहाणा असून मूर्ख.
उपंढर – ढोंग.
गाथागोवी – गुंतागुंत, कटकट.
मैंदावे – फसवणूक.
बंकनाळे – नाळेच्या द्वारे.
निर्वुमले – घाबरून जाणे, कासावीस होणे.
आवेवहीन – अवयवहीन.
सिंतरिले – फसविले.
आरंधे – दुःखाचा कडेलोट.
संदिसे – नुकतेच.
वाट्यावेधला – टांगल्यासारखा.
पोटली – पोटाचा जाळ.
मकरध्वजायेती – (मदन,प्रेम) यांना भुलून.
अमृतकळा – गालफडे.
त्रिविधाताप – आध्यात्मिक, आधिभौतिक, आधिदैविक.
वो भाईले – भक्तिपूर्वक धावा.
मोतिकाक्षर – ओम्  हे एकाक्षर.

दासबोध दशक निवडा

दशक ०१ - स्तवनाचा
दशक ०२ - मूर्खलक्षणांचा
दशक ०३ - स्वगुणपरीक्षा
दशक ०४ - नवविधा भक्ती
दशक ०५ - मंत्रांचा

दशक ०६ - देवशोधन
दशक ०७ - चतुर्दश ब्रह्मांचा
दशक ०८ - मायोद्भव
दशक ०९ - गुणरूप
दशक १० - जगज्जोतीनाम

दशक ११ - भीमदशक
दशक १२ - विवेकवैराग्य
दशक १३ - नामरूप
दशक १४ - अखंडध्याननाम
दशक १५ - आत्मदशक

दशक १६ - सप्ततिन्वय
दशक १७ - प्रकृतिपुरुष
दशक १८ - बहुजिनसी
दशक १९ - शिकवण
दशक २० - पूर्णनामदशक

इतर श्राव्य पुस्तके  निवडा 

 

कृष्णाकाठ

कविता विंदांची

कविता कुसुमाग्रजांची