राज्य मराठी विकास संस्था
मराठी संकेतस्थळांची स्पर्धा २०१३

छायाचित्र दालन

 • संस्थेने आयोजित केलेल्या 'स्वातंत्र्योत्तर मराठी-कन्नड साहित्य' या चर्चासत्राच्या उदघाटन प्रसंगी संस्थेच्या तत्कालीन संचालक डॉ. सरोजिनी वैद्य, श्री. के. ज. पुरोहित, श्री. गो. म. कुलकर्णी व इतर मान्यवर.

  संस्थेची निर्मिती असलेल्या आकाशदीप या दृकश्राव्य मालिकेतील एका प्रसंगात ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. वसंतराव गोवारीकर व डॉ. अशोक दा. रानडे.

  संस्थेने आयोजित केलेल्या 'तेलुगु मराठी साहित्य चर्चासत्राच्या' उदघाटन समारंभात बोलताना संस्थेच्या तत्कालीन संचालक डॉ. सरोजिनी वैद्य, व्यासपीठावर इतर मान्यवर.
  ज्येष्ठ इतिहासकार कै. त्र्यं. शं. शेजवलकर जन्मशताब्दी समारोह प्रसंगी आपले विचार व्यक्त करताना संस्थेच्या तत्कालीन संचालक डॉ. सरोजिनी वैद्य. व्यासपीठावर तत्कालीन शालेय शिक्षणमंत्री मा. श्री. सुधीर जोशी व प्रा. राम बापट.
  नॅशनल बुक ट्रस्ट व लोकवाङ्मयगृह यांच्या सहकार्याने संस्थेने मुंबईत आयोजित केलेल्या 'राष्ट्रीय पुस्तक सप्ताह' व 'ग्रंथ प्रदर्शन' यांच्या उदघाटन प्रसंगी बोलताना संस्थेच्या तत्कालीन संचालक डॉ. सरोजिनी वैद्य. व्यासपीठावर ज्येष्ठ साहित्यिक श्री. गंगाधर गाडगीळ व प्रकाशक श्री. सदानंदभटकळ.
  'दक्षिण भारतातील मराठी वाङ्मयाचा इतिहास' या प्रकल्पातील अखेरचा ग्रंथ 'आंध्र-कर्नाटक खंड' च्या प्रकाशनप्रसंगी तत्कालीन शालेय शिक्षणमंत्री मा. रामकृष्ण मोरे, संस्थेचे तत्कालीन संचालक डॉ. निर्मलकुमार फडकुले, प्रकल्प संपादक डॉ. वसंत जोशी व इतर मान्यवर.
  संस्थेने आयोजित केलेल्या 'वैद्यकीय विषयावरील दिवाळी अंकः वास्तव आणि अपेक्षा' या परिसंवादात बोलताना डॉ. ज्योती तासकर, सोबत डॉ. राजेंद्र आगरकर व डॉ. सुरेश नाडकर्णी.
  'मराठी ग्रंथसूची- भाग ३' च्या प्रकाशन समारंभात ग्रंथसूचीचे संपादक श्री शरद साठे यांचा सत्कार करताना तत्कालीन शालेय शिक्षणमंत्री मा. रामकृष्ण मोरे.
  मराठीतून हिंदीत अनुवाद केलेल्या संस्थेच्या दहा पुस्तकांचे प्रकाशन करताना ज्येष्ठ उर्दू कवी श्री. गुलजार, महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री मा. विलासराव देशमुख, तत्कालीन शिक्षणमंत्री मा. श्री. रामकृष्ण मोरे व संस्थेच्या संचालक श्रीमती वसुंधरा पेंडसे-नाईक.
  संस्थेच्या 'अर्वाचीन महाराष्ट्राची जडणघडण' या मालिकेतील 'डॉ. अं. का. प्रियोळकर : व्यक्ती आणि कार्य' या डॉ. वि.बा. प्रभुदेसाई लिखित पुस्तकाचे प्रकाशन करताना डॉ. सुभाष भेंडे सोबत संस्थेच्या संचालक श्रीमती वसुंधरा पेंडसे-नाईक, श्रीमती ज्योतिका ओझरकर.
  संस्थेच्या 'अर्वाचीन महाराष्ट्राची जडणघडण' या मालिकेतील डॉ. भा. र. साबडे लिखित शंतनुराव किर्लोस्कर : व्यक्ती आणि कार्य' या पुस्तकाचे प्रकाशन करताना श्री. मुकुंदराव किर्लोस्कर. व्यासपीठावर श्री. श्री. पु. भागवत, श्री. कुमार केतकर, डॉ. भा. र. साबडे, श्रीमती श्रद्धा बेलसरे व संस्थेच्या संचालक श्रीमती वसुंधरा पेंडसे-नाईक.
  संस्थेने प्रकाशित केलेल्या यंत्रालयाचा ज्ञानकोश या महत्वपूर्ण ग्रंथाचे प्रकाशन करताना ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर. सोबत ज्ञानकोशाचे लेखक श्री. शं. गो. भिडे, संस्थेच्या संचालक श्रीमती वसुंधरा पेंडसे-नाईक.