संस्थेचे कामकाज तिच्या नियामक मंडळाच्या सल्ल्यानुसार चालते. हे
नियामक मंडळ पदसिद्ध सदस्य व अशासकीय सदस्य यांचे मिळून बनलले असते. त्याची रचना
पुढीलप्रमाणे आहे.
संस्थेचे संचालक हे नियामक मंडळाचे सदस्य सचिव म्हणून काम पाहतात. याशिवाय, पुढील यादीमध्ये समावेश नसलेल्या परंतु मराठीच्या अभिवृद्धीसाठी सहभाग आवश्यक असलेल्या व्यक्तींनाही नियामक मंडळाचे सदस्य म्हणून नामनिर्देशित करता येते. मात्र अशा व्यक्तींची संख्या पाचपेक्षा अधिक नसते. अ. भा. मराठी साहित्य महामंडळातर्फे भरणारे साहित्य संमेलन, अ. भा. मराठी नाट्य परिषदेतर्फे भरणारे नाट्य संमेलन व मराठी विज्ञान परिषदेतर्फे भरणारे विज्ञान संमेलन या तिन्ही संमेलनाचे अध्यक्ष हे विशेष निमंत्रित सदस्य असतात आणि इतर प्रवाहांना सामील करून घ्यावयाचे असेल तेव्हा उरलेल्या दोन पदांसाठी त्यांचा विचार करण्यात येतो.या सदस्यांची नियुक्ती शासन आवश्यकतेनुसार करते.

पदसिद्ध सदस्य |
||
| १ मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
२ शिक्षणमंत्री (शालेय शिक्षण) महाराष्ट्र राज्य ३ मुख्य सचिव ४ प्रधान सचिव, सामान्य प्रशासन विभाग ५ सचिव, शालेय शिक्षण ६ सचिव, माहिती तंत्रज्ञान ७ संचालक, आदिवासी संशोधन व सदस्य विकास संस्था, पुणे ८ अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ,मुंबई ९ अध्यक्ष, विश्वकोश निर्मिती मंडळ , वाई १० संचालक, भाषा संचालनालय |
|
|
नियामक मंडळाच्या अशासकीय सदस्यांची नेमणूक शासनातर्फे पुढीलप्रमाणे करण्यात येईल. |
||
| १. अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ
२. मराठी साहित्यक्षेत्रातील समीक्षक ३. मराठी साहित्यक्षेत्रातील ललित लेखक ४. मानव्यविद्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती ५. तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती ६. कृषिविज्ञान क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती ७. महाराष्ट्राबाहेरील मराठीच्या प्राध्यापकांचा प्रतिनिधी ८. शिक्षणशास्त्र क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती ९. प्रसारमाध्यम प्रतिनिधी १०. महाराष्ट्रातील विद्यापीठांच्या मराठी विभागाचा प्रतिनिधी ११. मराठीच्या विकासाचे काम करणा-या महाराष्ट्रातील मराठी संस्थांचा एक प्रतिनिधी १२. मराठीच्या विकासाचे काम करणा-या महाराष्ट्राबाहेरील मराठी संस्थांचा एक प्रतिनिधी १३. भाषा विज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती १४. विज्ञान क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती सदस्य १५. लोकसंस्कृती क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती १६. महाराष्ट्रातील विद्यापीठांमधील भाषाविज्ञान विभागांचा प्रतिनिधी १७. महाराष्ट्रातील उद्योजक, व्यापार, व्यवस्थापक यांचा एक प्रतिनिधी १८. रंगभूमी, चित्रपट व सादरीकरणक्षम कला यांचा एक प्रतिनिधी १९. बृहन्महाराष्ट्र परिषदेने नियुक्त केलेला एक प्रतिनिधी २०. जागतिक मराठी परिषदेचा प्रतिनिधी |
|
|