राज्य मराठी विकास संस्था
मराठी संकेतस्थळांची स्पर्धा २०१३

कोशवाङ्मय

१) कोश व सूची वाङ्मय : स्वरूप आणि साध्य
संपादन - सरोजिनी वैद्य, सुषमा पौडवाल, अनिता जोशी, कविता महाजन
बी.ए. एम. ए. चे मराठी विषयाचे विद्यार्थी, ग्रंथालयशास्त्र विद्यार्थी तसेच संशोधनपर लेखन करू इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त. संस्कृत-इंग्रजी-मराठी भाषांतील वैविध्यपूर्ण कोश व सूचीवाङ्मयाचा सांगोपांग परिचय करून देणारा ग्रंथ.

प्रथम आवृत्ती १ मे १९९७ पुनर्मुद्रण- १ मार्च २०१२

पृष्ठे ३७८ /मूल्य २७५

२) शालेय मराठी शब्दकोश
वसंत आबाजी डहाके, गिरीश पतके
इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंतच्या सर्व विषयांच्या मराठी पाठ्यपुस्तकांशी संबंधित शब्द, संज्ञा, वाक्प्रचार आदींची सचित्र व सोदाहरण ओळख.
मराठी अभ्यास परिषदेतर्फे दिले जाणारे मराठी भाषाविषयक लेखनाचे महाबॅंक पारितोषिक १९९९
प्रथम आवृत्ती ऑगस्ट १९९७, सुधारून वाढविलेली दुसरी आवृत्ती एप्रिल २००० पुनर्मुद्रण २००१(आवृत्ती संपली. लवकरच सुधारित तिसरी आवृत्ती येईल.)

३) विज्ञान संकल्पना कोश
प्रा. रा. वि. सोवनी इयत्ता ५ वी ते १० पर्यंतच्या रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र व जीवशास्त्रातील संकल्पना सुबोध मराठीतून उलगडून सांगणारा कोश.  मराठी विज्ञान परिषदेच्या सहकार्याने.

प्रथम आवृत्ती फेब्रुवारी २००६ दुसरी आवृत्ती डिसेंबर २००६

४) मराठी लघुलेखन शब्दकोश
व. वा. इनामदार
प्रथम आवृत्ती जानेवारी १९९६ पुनर्मुद्रण- जुलै २००१

मराठी लघुलेखनाचे शिक्षक आणि विद्यार्थी यांना सरावासाठी उपयुक्त ठरलेला लघुलेखनविषयक एकमेव ग्रंथ.

ना. गो. कालेलकर पुरस्कार, महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९९५-९६

पृष्ठे ३२०/ मुल्य १४०

५) दलित-ग्रामीण साहित्य शब्दकोश ( प्रथम खंड - अ ते घ )
संपादक - डॉ. गंगाधर पानतावणे
या खंडामध्ये दलित-ग्रामीण साहित्यातील सुमारे अडीच हजार शब्दांचा समावेश आहे. याकरिता इ.स. १८१८ ते २००५ या कालखंडात प्रकाशित झालेल्या साहित्यातून दलित-ग्रामीण जीवनानुभव व्यक्त झाले आहेत असे साहित्य या शब्दकोशासाठी आधारभूत मानले आहे.
प्रथम आवृत्ती- फेब्रुवारी २०१२

पृष्ठे २०६ / मूल्ये ३५०

६) दलित-ग्रामीण साहित्य शब्दकोश ( द्वितीय खंड - च ते न )
संपादक - डॉ. गंगाधर पानतावणे
या खंडासाठी इ.स. १८१८ ते २००५ या कालखंडात प्रकाशित झालेल्या साहित्यातून दलित-ग्रामीण जीवनानुभव व्यक्त झाले आहेत असे साहित्य या शब्दकोशासाठी आधारभूत मानले आहे. या खंडामध्ये दलित-ग्रामीण साहित्यातील सुमारे १७०० शब्दांचा समावेश आहे.
प्रथम आवृत्ती- फेब्रुवारी २०१४
पृष्टे १८२ / मूल्य ३५२

७) दलित ग्रामीण साहित्य रूढी, प्रथा, परंपरा, विधिकोश
संपादक - डॉ. गंगाधर पानतावणे, डॉ. अशोक सोलनकर
दलित, ग्रामीण, आदिवासी, भटके यांच्या समाजजीवनातील श्रद्धा, परंपरा, विधी, रीतिरिवाज, नवससायास, ग्रामदैवते, यांची माहिती रेखाटनांसह स्पष्ट करणारा कोश.
प्रथम आवृत्ती - फेब्रुवारी २०१३

पृष्ठे ११८ / मूल्य ५६२

८) यंत्रालयाचा ज्ञानकोश
संपादक - शंकर गोपाळ भिडे
यंत्रालयातून आलेली नवी यंत्रे व नवी व्यवस्थापकीय तंत्रे हाताळयासाठी आणि नव्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी सज्ज करणारा, यंत्रांच्या सर्वांगीण ज्ञानाने समृद्ध करणारा माहितीपूर्ण ग्रंथ.


प्रथम आवृत्ती सप्टेंबर २००३

९) फार्सी-मराठी व्युपत्तिकोश
संपादक - डॉ. यू. म. पठाण
मध्ययुगीन व वर्तमानकालीन मराठीमध्ये १४ व्या शतकापासून रुजलेल्या, स्थिरावलेल्या अरबी, तुर्की, फारसी शब्दांचे अस्तित्व संत वाङ्मय, ऐतिहासिक पत्रात्मक गद्य, बखर वाङ्मय, शाहिरी वाङ्मय ते आजच्या वृत्तपत्रीय लेखन, कायदा, शासनव्यवहार या सर्वच बाबतीत या शब्दांचे अस्तित्व जाणवण्यासारखे आहे. मराठी व फार्सीचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. यू.म.पठाण यांनी यांनी संपादन केलेल्या या व्युत्पत्तिकोशात त्या शब्दांची व्युत्पत्ती, उच्चारण, कालमानानुसार त्यांना प्राप्त झालेला नवा अर्थ इ. अनेक बाबींचा ऊहापोह केलेला आहे. ज्यांना मध्ययुगीन फर्माने, सनदा, ऐतिहासिक पत्रे, दप्तरे, बखरी इ.चे अध्ययन-संशोधन करायचे आहे त्यांना तर हा कोश उपयुक्त वाटेलच, परंतु आजच्या मराठीच्या विविध बोलींच्या अभ्यासकालाही त्याचा उपयोग होईल.
पृष्टे बारा + २०८ + ६५ + ३ / मूल्य ६०० प्रकाशन २००८

१०) वस्त्रनिर्मिती माहितीकोश - खंड १ - तंतुनिर्माण व तंतुविज्ञान
संपादक - डॉ. चंद्रकांत काणे, प्रा. सुरेश महाजन
नैसर्गिक व मानवनिर्मित तंतू, त्यांची उत्पादन प्रक्रिया, रासायनिक व भौतिक गुणधर्म, त्यांच्या उपयोगाची विविध क्षेत्रे यांची सविस्तर माहिती देणारा खंड
प्रथम आवृत्ती फेब्रुवारी २००७
पृष्ठे -२९४ / मूल्य-४००

११) वस्त्रनिर्मिती माहितीकोश - खंड २ - सूतनिर्माण -
संपादक -श्री. अशोक गर्दे, श्री. यशवंत देशपांडे
सूतनिर्मितीच्या पध्दती, त्याकरिता वापरली जाणारी विविध प्रकारची यंत्रसामग्री, सूताची गुणवत्ता मोजण्याच्या विविध पध्दती व उपकरणेयांची सविस्तर माहिती देणारा खंड
प्रथम आवृत्तीफेब्रुवारी २००७
पृष्ठे -२८१ / मूल्य-४००

१२) वस्त्रनिर्मिती माहितीकोश - खंड ३ - कापडनिर्माण –
संपादक - श्री. अशोक गर्दे, श्री. यशवंत देशपांडे
संपादक - प्रा. दिनकर आजगावकर, प्रा. हसमुख शाह, प्रा. सुरेश महाजन कापड बनविण्याची पूर्वप्रक्रिया, कापडाच्या वेगवेगळ्या विणी, त्यांतील दोष व ते निवारण्याचे उपाय, गुणवत्ता-मापनाच्या पद्धती व त्यासाठी लागणाऱ्या उपकरणांची सांगोपांग चर्चा करणारा खंड.
प्रथम आवृत्ती मार्च २०११
पृष्ठे -३२६ / मूल्य-५००

१३) वस्त्रनिर्मिती माहितीकोश - खंड ४ - रासायनिक प्रक्रिया - -
संपादक – कै. डॉ. वामन आचवल, श्री. प्रभाकर पडते, प्रा.गोविंद जोशी
या खंडात वस्त्रनिर्माण रासायनिक प्रक्रियेची माहिती देऊन भारतीय व्यवसायामध्ये महत्वाचे स्थान असलेल्या कापूस या तंतूस प्राधान्य देऊन इतर तंतूंची योग्य ती माहिती दिलेली आहे.
प्रथम आवृत्ती फेब्रुवारी २०१४/

पृष्ठे २४+५१८/ मूल्य १४२०