राज्य मराठी विकास संस्था
मराठी संकेतस्थळांची स्पर्धा २०१३

भाषाविषयक


१) आधुनिक भाषाविज्ञान : सिद्धांत आणि उपयोजन

डॉ. मिलिंद मालशे

बी.ए/ एम.ए. चे मराठीचे विद्यार्थी, मराठीचे अध्यापक त्याचप्रमाणे भाषा आणि समाज यांच्या परस्परसंबंधाविषयी जिज्ञासा असणारे वाचक यांच्यासाठी उपयुक्त ठरलेला ग्रंथ.लोकवाङमयगृहाच्या सहकार्याने.


पहिली आवृत्ती संपली आहे. विक्रीसाठी उपलब्ध नाही

पृष्ठे - २५६
मूल्य-१५०
 
२) शिक्षण, शिक्षक व अभ्यासक्रम
वासुदेव बळवंत पटवर्धन.
संपादन - रमेश पानसे

जन्मभाषेचा पाश तोडून आम्ही काय करणार? ना देश, ना गोत, ना राष्ट्र असे आम्हांस व्हावयाचे आहे काय?'' या मौलिक आणि मूलभूत प्रश्नाला भिडणारे, मराठीच्या शिक्षणक्रमाशी संबंधित असलेले एक जुने (१९०६) चिरतरुण पुस्तक.

द्वितीयावृत्ती - मे २०१४

पृष्ठे - १२९
मूल्य- ३७६
 
३) मराठी भाषा : वाढ आणि बिघाड

श्री.के.क्षीरसागर

मराठी बोलताना आणि तिच्यातून लेखनव्यवहार पार पाडताना सर्वसामान्य शिक्षित माणसाच्या मनात आज जे जे प्रश्न घुटमळत आहेत त्यांचा मुक्त मनाने घेतलेला परामर्श.

पुनर्मुद्रण मार्च २०१२

पृष्ठे १९५
मूल्य २२५
 
४)`वृद्धि:' भाषेचे आणि भाषाभ्यासाचे विकसन

दिनेश द. माहुलकर

विविध प्रकारची कुंपणे तोडून पलीकडे जा हा महर्षी पाणिनीने दिलेला मंत्र अधोरेखित करण्याच्या हेतूने पौर्वात्य आणि पाश्चिमात्य भाषाविषयक विचारपरंपरांचा आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भाषावैज्ञानिक माहुलकर यांनी घेतलेला तुलनात्मक वेध.

द्वितीयावृत्ती- मे २०१४

पृष्ठे १३९
मूल्य ३७६
 
५)बेलभाषा

सुमन बेलवलकर

परभाषिकांना मराठी शिकवताना जे स्वभाषेचे आणि संस्कृतीचे दर्शन घडते त्याचा खेळकरपणाने प्रत्यय देणारे पुस्तक.

प्रथम आवृत्ती- २७ फेब्रुवारी २०००

पृष्ठे - ११०
मूल्य- १००
 
६)भाषा - आपली सर्वांचीच
अविनाश बिनीवाले

येणार्‍या शतकात आपले काय होणार अशी भीती अनेक भाषासमुदायांना वाटते आहे. भारतातल्या व भारताबाहेरच्या भाषांची सद्य:स्थिती सांगणारे माहितीपूर्ण, चुरचुरीत शैलीतलेपुस्तक.

प्रथम आवृत्ती- २७ फेब्रुवारी २०००

पृष्ठे - १५०
मूल्य-१५०
७)पालघर तालुका - बोली, समाज व संस्कृती
संपादक डॉ. प्रतिभा कणेकर

मुंबईजवळील पालघर तालुक्यामधील बोलल्या जाणाऱ्या आदिवासी, आगरी, कुणबी,भंडारी, वाडवळ व मच्छिमार या बोलींचा तसेच या बोली बोलत असलेल्या समाजाच्या संस्कृतीचा वेध घेणारा समाजभाषावैज्ञानिक अभ्यास.

प्रथम आवृत्ती - डिसेंबर २००९    

पृष्ठे - ३५२
मूल्य-६५०
 
८) महाराष्ट्राचा भषिक नकाशा ( पूर्वतयारी )
प्रमुख संशोधक - डॉ. रमेश धोंगडे/ संशोधन समन्वयक आणि संशोधक साहाय्यक -डॉ. अशोक सोलनकर

प्रमाण मराठी, बोली, उपभाषा, आदिवासींच्या भाषा, मिश्रभाषा इत्यादींचे विविध भाषिक आविष्कार, त्यांची प्रदेशानुसार नकाशाद्वारे मांडणी करून महाराष्ट्रातील भाषांची वैविध्यपूर्ण माहिती देणारा ग्रंथ.

प्रथम आवृत्ती - जून १९९५ / पुनर्मुद्रण - फेब्रुवारी २०१३

पृष्ठे २७५
मूल्ये ५३०
 
 


९) वाचू आनंदे - ( बाल गट भाग १ व २ )
संपादक- माधुरी पुरंदरे, नंदिता वागळे
शालेय स्तरासाठी मराठी साहित्यातील उत्तमोत्तम उतार्‍यांचा परिचय करून देणारी पूरक वाचनाची चार पुस्तके, विविध चित्रशैलीतील चित्रांसह (वयोगट ९ ते १२ व १२ ते १५ साठी) ज्योत्स्ना प्रकाशनाच्या सहकार्याने.

प्रथम आवृत्ती डिसेंबर २००१,पुनर्मुद्रण मार्च २००३, २००४
दुसरी आवृत्ती जून २००५

बाल गट - एक - पृष्ठे १५९
बाल गट- दोन- पृष्ठे १७७
मूल्ये १२५
मूल्ये १२५
( दोन्ही संचाची किंमत रुपये २५०/- )
 


१०)वाचू आनंदे - ( कुमार गट भाग १ व २ )
संपादक- माधुरी पुरंदरे, नंदिता वागळे
शालेय स्तरासाठी मराठी साहित्यातील उत्तमोत्तम उतार्‍यांचा परिचय करून देणारी पूरक वाचनाची चार पुस्तके, विविध चित्रशैलीतील चित्रांसह (वयोगट ९ ते १२ व १२ ते १५ साठी) ज्योत्स्ना प्रकाशनाच्या सहकार्याने.

प्रथम आवृत्ती डिसेंबर २००१,पुनर्मुद्रण मार्च २००३, २००४
दुसरी आवृत्ती जून २००५

कुमार गट- एक - पृष्ठे -१७६
प्रथम आवृत्ती – २००१
पुनर्मुद्रण - २००३, २००४
दुसरी आवृत्ती जून २००५
पुनर्मुद्रण- २००९, २०११, २०१३
कुमार गट - दोन - पृष्ठे १९२
मूल्य- १२५
मूल्य- १२५
(दोन्ही संचाची किंमत रुपये २५०/-)