राज्य मराठी विकास संस्था
मराठी संकेतस्थळांची स्पर्धा २०१३

अर्वाचिन महाराष्ट्राची ज़डणघडण

 • १) महाराष्ट्र साहित्य परिषद
  म. श्री. दीक्षित

  मराठी साहित्य आणि संस्कृतीविषयक कार्य करीत असलेल्या, शताब्दी ओलांडून पुढे चाललेल्या ज्येष्ठ साहित्यसंस्थेचा परिचय

  प्रथम आवृत्ती १ मे १९९६ ; दुसरी आवृत्ती जून २००५

  पृष्ठे -११४
  मूल्य- १२०
   
  २) व्याकरणकार मोरो केशव दामले : व्यक्ती आणि कार्य
  कृ. श्री. अर्जुनवाडकर

  कै. दामले यांच्या मराठी व्याकरण विचारातील योगदानाची साक्षेपी ओळख.

  प्रथम आवृत्ती - १ मे १९९७ ; दुसरी आवृत्ती - जून २००५

  पृष्ठे - १०३
  मूल्य - १००
   
  ३) काकासाहेब कालेलकर : व्यक्ती आणि कार्य
  मृणालिनी जोगळेकर

  गांधीवादी चळवळी आणि मराठी साहित्य-संस्कृती यांचा काकासाहेबांच्या जीवनकार्याच्या अनुषंगाने घेतलेला परामर्श.

  प्रथम आवृत्ती एप्रिल १९९८

  पृष्ठे - १८०
  मूल्य - १५०
   
  ४) गंगाधर बाळकृष्ण सरदार : व्यक्ती आणि कार्य
  हेमंत वि. इनामदार

  संतवाङ्मयातील सामाजिकतेचा परामर्श घेणार्‍या एका विचारवंताच्या जीवनकार्याचा परिचय.

  प्रथम आवृत्ती - एप्रिल १९९८

  पृष्ठे - १०८
  मूल्य - ६०

   

  ५) बालगंधर्व : व्यक्ती आणि कार्य
  मोहिनी वर्दे

  नटश्रेष्ठ बालगंधर्वांच्या मराठी रंगभूमी व संगीत क्षेत्रातील असामान्य कार्याचा परिचय.

  प्रथम आवृत्ती - एप्रिल १९९८

  पृष्ठे - ११४
  मूल्य - ६०  ६) मातृसेवा संघ
  विनया खडपेकर

  कमलाताई होस्पेट यांनी स्थापन केलेल्या नागपूरच्या 'मातृसेवा संघ' या समाजसेवी संस्थेने केलेल्या कार्याची ओळख.

  प्रथम आवृत्ती - मार्च २०००

  पृष्ठे - १०४
  मूल्य - ६०

   

  ७) 'सकाळ' वृत्तपत्र आणि वृत्तपत्रसमूह
  स्वाती सुहास कर्वे

  महाराष्ट्रातील एका मान्यवर वृत्तपत्राच्या संपन्न व चौफेर वाटचालीचा अद्ययावत परिचय.

  प्रथम आवृत्ती - जानेवारी २००१ ; दुसरी आवृत्ती - सप्टेंबर २००५

  पृष्ठे - १३८
  मूल्य - १२५

   

  images/scan0034.jpg
  ८) शंतनुराव किर्लोस्कर : व्यक्ती आणि कार्य
  डॉ. भा.र. साबडे

  महाराष्ट्रातील नामवंत उद्योजक शंतनुराव किर्लोस्कर यांचे चरित्र.

  प्रथम आवृत्ती - २००३

  पृष्ठे - १३८
  मूल्य - १६०

   

  ९) डॉ. अ.का.प्रियोळकर : व्यक्ती आणि कार्य
  डॉ. वि.बा.प्रभुदेसाई

  संशोधकांचे संशोधक समजल्या जाणार्‍या डॉ. प्रियोळकरांच्या योगदानाची साक्षेपी ओळख.

  पुनर्मुद्रण २०१०

  पृष्ठे - १२१
  मूल्य-१५०