राज्य मराठी विकास संस्था
मराठी संकेतस्थळांची स्पर्धा २०१३

नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेनिंग ( एन.सी.ई.आर.टी.) यांच्या पाठ्यपुस्तकांचे अनुवाद

   
  १) स्वातंत्र्यापासूनचे भारताचे राजकारण 
  अनुवादक - अभय दातार / विवेक घोटाळे

  पॉलिटिक्स इन इंडिया सिन्स् इन्डिपेन्डन्टस् या इंग्रजी पुस्तकाचे भांषातर. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर नवीन–राष्ट्र-उभारणी व लोकशाही व्यवस्था स्थापन करण्यात आलेली आव्हाने, त्यातून काढलेला मार्ग, परराष्ट्र धोरणाची जडणघडण, कॉंग्रेसच्या व्यवस्थेसमोरील आव्हाने आणि १९९० नंतरच्या बदलत्या भारतातील राजकारण इ. विषयांची माहिती देणारे पुस्तक.

  प्रथम आवृत्ती - फेब्रुवारी २०१४

  पृष्ठे १८२
  मूल्य ३५६
   
  २) भारतीय इतिहासातील काही अभ्यास विषय ( भाग १ )
  अनुवादक - जास्वंदी वांबूरकर-उटगीकर

  थीम्स् इन इंडियन हिस्ट्री – पार्ट I - या इंग्रजी पुस्तकाचे भांषातर. या पुस्तकात असणाऱ्या एकूण चार भागांतून प्राचीन भारतीय इतिहासाची सविस्तर मांडणी करण्यात आली आहे. प्राचीन भारतातील सिंधू संस्कृतीपासून ते इ . स. च्या सहाव्या शतकापर्यंतची भारतातील अर्थव्यवस्था, राजकीय जीवन, वर्णव्यवस्था, ग्रामीण जीवन, धार्मिक चालीरीती आदि क्षेत्रांत झालेल्या बदलांचीही माहिती रंजकपणे दिलेली आहे.

  प्रथम आवृत्ती – मे २०१४

  पृष्ठे १२०
  मूल्य ४१८