राज्य मराठी विकास संस्था
मराठी संकेतस्थळांची स्पर्धा २०१३

शैक्षणिक

१)मराठी लेखन मार्गदर्शिका
यास्मिन शेख

सर्वसामान्य नागरिक, शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, मराठी भाषा शिकणाऱ्या अन्य भाषक व्यक्ती, दूरचित्रवाणीपटावर लेखन करणारे कलावंत, पाट्या रंगवणारे रंगारी, टंकलेखक, संगणकावर अक्षरजुळणी करणारे जुळारी अशा सर्वांना मराठीत लेखन करण्यासाठी बिनचूक मार्गदर्शन करणारे उपयुक्त पुस्तक

प्रथम आवृत्ती - जून १९९७  दुसरी आवृत्ती - जानेवारी १९९९

पृष्ठे - १८२
मूल्य ८० रुपये.
 
२) प्रशासनिक मराठी भाषेचा विकास

गीता भागवत

प्रशासनिक लेखन करणाऱ्यांसाठी मार्गदर्शनपर सूचनांसह, प्रशासनिक मराठीचा वस्तुनिष्ठ व शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेला अभ्यास. विदर्भ साहित्य संघ, नागपूर यांच्या वा. वि. मिराशी स्मृती वैचारिक लेखन पुरस्कारासह १९९७ इतर दोन पुरस्कार.

पुनर्मुद्रण- मार्च २०१२

पृष्ठे ४२२
मूल्य २७५ रुपये.
 
३) शिक्षणाचे अंतरंग - लीला पाटील

विद्यार्थ्याला केंद्रस्थानी मानून हसत खेळत शिक्षण देण्याचा मार्ग दाखविणारे तसेच भाषा शिक्षण, शिक्षणव्यवस्था यांविषयींच्या मतांचा पुनर्विचार करायला भाग पाडणारे पुस्तक.

पुनर्मुद्रण- फेब्रुवारी २०१३
पृष्ठे - १९२
मूल्य १८५ रुपये.