राज्य मराठी विकास संस्था
मराठी संकेतस्थळांची स्पर्धा २०१३

दक्षिण भारतातील मराठी वाङ्मयाचा इतिहास

   
  १)त्रिवेंद्रमची मराठी हस्तलिखिते
  संपादक - डॉ. वसंत जोशी

  त्रिवेंद्रमच्या ग्रंथालयातील प्राचीन मराठी हस्तलिखितांची वर्णनात्मक सूची.

  प्रथम आवृत्ती फेब्रुवारी १९९६

  पुनर्मुद्रण - मार्च २०१२

  पृष्ठे - ४१
  मूल्य - ५०
   
  २) मद्रासची मराठी हस्तलिखिते
  संपादक - डॉ. वसंत जोशी

  गव्हर्नमेंट ओरिएंटल मॅन्युस्क्रिप्ट्स लायब्ररी, चेन्नई (मद्रास) येथील मराठी हस्तलिखितांची वर्णनात्मक सूची.

  प्रथम आवृत्ती फेब्रुवारी १९९६

  पृष्ठे - २०८
  मूल्य - १५०
   
  ३)हैदराबादची मराठी हस्तलिखिते

  संपादक - डॉ. श्री.रं.कुलकर्णी ,डॉ. व.दा.कुलकर्णी, प्रा. द.पं.जोशी

   उस्मानिया विद्यापीठ आणि मराठी साहित्य परिषद हैदराबाद, येथील मराठी हस्तलिखितांची वर्णनात्मक सूची.

  प्रथम आवृत्ती ऑगस्ट १९९९

  पृष्ठे -१६७
  मूल्य- १००
   
  ४) कर्नाटकातील मराठी हस्तलिखिते

  डॉ. भीमाशंकर देशपांडे

  आजच्या कर्नाटक राज्यात असणाऱ्या तीस जुन्या ग्रंथसंग्रहालयातील मराठी हस्तलिखितांची वर्णनात्मक सूची.

   प्रथम आवृत्ती फेब्रुवारी १९९६

  पृष्ठे - १८८
  मूल्य - १५०
   
  ५) तंजावर सूची ( खंड सहावा)

  संपादक - टी. आर. भीमराव केसकर

  सरस्वतीमहाल ग्रंथालयातील मराठी हस्तलिखितांची अद्ययावत परिपूर्ण सूची. पहिले पाच खंड सरस्वतीमहालतर्फे पूर्वप्रकाशित.

  प्रथम आवृत्ती ऑक्टोबर १९९७

  पृष्ठे -१९६
  मूल्य- २००
   
  ६)दक्षिण भारतातील मराठी वाङमयाचा इतिहास-तंजावर खंड

  संपादक - डॉ. वसंत जोशी

  तंजावर येथील मराठी वाङ्मयाचा सोळा तज्ज्ञ अभ्यासकांनी घेतलेला वस्तुनिष्ठ चिकित्सक आढावा.

  प्रथम आवृत्ती ऑक्टोबर १९९७

  पृष्ठे - ७११
  मूल्य - ५००
  ७)दक्षिण भारतातील मराठी वाङ्मयाचा इतिहास आंध्र-कर्नाटक खंड
  संपादक - डॉ. वसंत जोशी व डॉ. द.दि.पुंडे

  आंध्र-कर्नाटकातील हस्तलिखित साहित्याचा परामर्श घेणारा, अनेक मान्यवर अभ्यासकांनी सिद्ध केलेला ग्रंथ.``दक्षिण भारतातील मराठी वाङ्मयाचा इतिहास'' या प्रकल्पातील शेवटचा ग्रंथ.

  पृष्ठे - ६२५
  मूल्य-५००
   
  ८)दाक्षिणात्य साहित्य-संस्कृतीचा मराठीशी अनुबंध
  डॉ. माणिक धनपलवार

  मराठी भाषा, महाराष्ट्राची संस्कृती आणि दाक्षिणात्य साहित्य व संस्कृती यांच्यातील परस्पर नातेसंबंध उलगडून दाखविणारा मौलिक, अभ्यासपूर्ण ग्रंथ.

  प्रथम आवृत्ती ऑक्टोबर १९९७
  पुणे विद्यापीठाचा परमंहस स्वामी स्वरूपानंद पुरस्कार २००१
  पृष्ठे - ३६२
  मूल्य - ३००
   
  ९)साहित्यसेतू
  श्री. रं.कुलकर्णी
  नामदेवादी मराठी संतकवींचा हिंदी, उर्दू कवींवर असलेला प्रभाव सविस्तर व सोदाहरण उलगडून दाखविणारा ग्रंथ.

  प्रथम आवृत्ती २३ सप्टेंबर १९९८
  पृष्ठे - २३४
  मूल्य - ४५
   
  १०)दखनी भाषा : मऱ्हाटी संस्कृतीचा एक आविष्कार
  श्री. रं. कुलकर्णी

  आज बोलीरुपात अस्तित्वात असलेल्या `दखनी' या दुर्लक्षित भाषेचा प्राचीन-अर्वाचीन स्वरूपाच्या मराठी भाषेशी, साहित्याशी व संस्कृतीशी असलेल्या पूर्व-अनुबंधाचा वेध

  प्रथम आवृत्ती २३ सप्टेंबर १९९८
  महाराष्ट्र फाऊंडेशनचा उत्तम संशोधन ग्रंथ पुरस्कार (१९९९), महाराष्ट्र राज्य पुरस्कार (१९९९)
  पृष्ठे - २२६
  मूल्य - ४५