राज्य मराठी विकास संस्था
मराठी संकेतस्थळांची स्पर्धा २०१३

विज्ञान प्रसार, दिल्ली ह्यांच्या प्रकाशनांचे अनुवाद

   
  १) का ? आणि कसे ?
  ( 'क्यों? और कैसे?' - या इंग्रजी पुस्तकाचे भाषांतर )
  लेखक - पार्थ घोष व इतर
  अनुवादक - श्रीमती संध्या पाटील-ठाकूर

  या पुस्तकात शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावर शिकवण्यात येणाऱ्या वैज्ञानिक तत्त्वांची पुनर्भेट घडवून आणलेली आहे. आपण शिकलेली वैज्ञानिक तत्त्वे आपल्या आजूबाजूच्या वस्तूंतून, घटनांमधून कशी प्रत्ययाला येतात हे ह्या पुस्तकात उत्तम रीतीने दाखवलेले आहे.

  प्रथम आवृत्ती- फेब्रुवारी २०१३

  पृष्ठे ५७
  मूल्य १५५
   
  २) तारकांशी मैत्री
  ( 'हॅलो स्टार्स' - या इंग्रजी पुस्तकाचे भाषांतर )
  लेखक- उषा श्रीनिवास
  भाषांतरकार- प्रदीप नायक

  या पुस्तकात तारे, तारकासमूह, त्यांच्या निरीक्षणासाठी वापरण्यात येणाऱ्या पद्धती ह्यांची माहिती सोप्या आणि रंजक रीतीने देण्यात आली आहे.

  प्रथम आवृत्ती – मे २०१४

  पृष्ठे ८३
  मूल्य ३२९