मराठी भाषा समाजाच्या तळापर्यंत रुजून सुदृढ व्हावी आणि सर्वांगाने बहरावी यासाठी आपले या संदर्भातील विचार,मते, सूचना आम्हाला जरूर कळवा. आपल्यातील सुसंवादातून मराठीच्या विकासाला गती मिळेल.
राज्य मराठी विकास संस्थेचे स्वरूप आणि कार्य या संबंधीची माहिती सर्व जिज्ञासूंपर्यंत पोहोचविणार्या या संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत !
विविध क्षेत्रांत होणारा मराठीचा वापर अधिकाधिक गुणवत्तापूर्ण होत जावा यासाठी प्रयत्नशील राहावे व मराठी भाषेच्या अभिवृद्धीची प्रक्रिया नियोजनपूर्वक गतिमान करावी ही या संस्थेच्या स्थापनेमागील दोन मुख्य उद्दिष्टे आहेत. त्यांनुसार सर्व स्तरांवर मराठीचा विकास साधण्यासाठी संस्था स्वतंत्रपणे उपक्रम हाती घेते. भाषा व संस्कृतीच्या क्षेत्रात मराठी भाषेच्या अभिवृद्धीसाठी काम करणाऱया विविध शासकीय व अशासकीय संस्थांमध्ये समन्वय राखून त्या संस्थांच्या साहाय्यानेही काही उपक्रम संस्था पार पाडते.
प्रकाशने
मराठी भाषा आणि साहित्याच्या विकासाप्रीत्यर्थ आम्ही प्रकाशित केलेली पुस्तके अधिक माहितीसाठी...