संस्थेविषयी  |  उद्दिष्टे  |  नियामक मंडळ  |  वाटचाल  |  कार्यशाळा  |  सद्य प्रकल्प  |  चर्चासत्रे  |  विविधा  |
प्रकाशने
 

शैक्षणिक

   
 
Next
 
1) मराठी लेखन मार्गदर्शिका
यास्मिन शेख
सर्वसामान्य नागरिक, शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, मराठी भाषा शिकणाऱया अन्य भाषक व्यक्ती, दूरचित्रवाणीपटावर लेखन करणारे कलावंत, पाट्या रंगविणारे रंगारी, टंकलेखक, संगणकावर अक्षरजुळणी करणारे जुळारी अशा सर्वांना मराठीत लेखन करण्यासाठी बिनचूक मार्गदर्शन करणारे उपयुक्त पुस्तक.

प्रथम आवृत्ती जून १९९७
दुसरी आवृत्ती जानेवारी १९९९

 
पृष्ठे - १८२
मूल्य ८० रुपये.
 
२) प्रशासनिक मराठी भाषेचा विकास

गीता भागवत

प्रशासनिक लेखन करणाऱयांसाठी मार्गदर्शनपर सूचनांसह, प्रशासनिक मराठीचा वस्तुनिष्ठ व शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेला अभ्यास.
विदर्भ साहित्य संघ, नागपूर यांच्या वा. वि. मिराशी स्मृती वैचारिक लेखन पुरस्कारासह १९९७ इतर दोन पुरस्कार.

 
पृष्ठे -४२२
मूल्य १५० रुपये.
 
3)कोश व सूची वाङ् मय : स्वरूप आणि साध्य
संपादन - सरोजिनी वैद्य, सुषमा पौडवाल, अनिता जोशी, कविता महाजन

बी.ए., एम.ए. चे मराठी विषयाचे विद्यार्थी, ग्रंथालयशास्त्र  विद्यार्थी तसेच संशोधनपर लेखन करू इच्छिणाऱयांसाठी उपयुक्त. संस्कृत-इंग्रजी-मराठी भाषांतील वैविध्यपूर्ण कोश व सूची वाङ् मयाचा सांगोपांग परिचय करून देणारा ग्रंथ.

प्रथम आवृत्ती १ मे १९९७

 
पृष्ठे - 378
मूल्य २०० रुपये.
 
४) मराठी लघुलेखन शब्दकोश

व.वा.इनामदार

मराठी लघुलेखनाचे शिक्षक आणि विद्यार्थी यांना सरावासाठी उपयुक्त ठरलेला लघुलेखनविषयक एकमेव ग्रंथ

ना. गो. कालेलकर पुरस्कार, महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९९५-९६

 
पृष्ठे - ३२२
मूल्य १४० रुपये.
 
५)शिक्षकांसाठी अध्ययन पुस्तिका

 

`मराठी वाचनपाठ' या इंग्रजी माध्यमासाठी असणाऱया इयत्ता ९ वी च्या पुस्तकाच्या अध्यापनासाठी संस्थेने शिक्षकांकरिता तयार केलेले मार्गदर्शनपर पुस्तक.

 
पृष्ठे - ११५
मूल्य २० रुपये.
 
६) शालेय मराठी शब्दकोश

वसंत आबाजी डहाके, गिरीश पतके

इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंतच्या सर्व विषयांसाठी असणाऱया मराठी पाठयपुस्तकांशी संबंधित शब्द, संज्ञा, वाकप्रचार आदींची सचित्र व सोदाहरण ओळख. सुधारून वाढविलेली दुसरी आवृत्ती.

शुभदा-सारस्वत प्रकाशनाच्या सहकार्याने.
 
पृष्ठे - ३६०,
मूल्य १०० रुपये
Back to top
Next
 
        Copyright © 2006, All Rights Reserved. Rajya Marathi Vikas Sanstha. Website Powered By Cybertech Networks Pvt. Ltd.